देव इस्राएलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्यांना मरणयातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात; इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात; म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे; जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे. मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात. ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात; ते मोठ्या डौलाने भाषण करतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवतात; त्यांची जीभ जगभर मिरवते. ह्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि त्यांच्याजवळचे पाणी भरपूर पितात. ते आणखी म्हणतात, “देवाला कसे समजणार? परात्पराला काय ज्ञान आहे?” पाहा, दुर्जन ते हेच; हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करत असतात.
स्तोत्रसंहिता 73 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 73
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 73:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ