YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 7:12-17

स्तोत्रसंहिता 7:12-17 MARVBSI

कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्याविरुद्ध तो आपली तलवार पाजळतो, त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे. त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत; त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत. पाहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो; उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो. त्याने खड्डा खणून खोल केला; आणि तोच त्या खड्ड्यात पडला. त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल; त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल. परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन; परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन.