YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 65:9-13

स्तोत्रसंहिता 65:9-13 MARVBSI

तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस; तू तिला फार फलद्रूप करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस; तिचे उंचवटे सपाट करतोस; तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस; तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस; आणि तुझे मार्ग समृद्धिमय झाले आहेत. रानांतली कुरणेही समृद्ध होतात; आणि डोंगरांना उल्लासाचे वेष्टन पडले आहे. कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत; खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत; ती मोठ्याने जयजयकार करतात व गातात.