“माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे; हे इस्राएला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो : मी देव, तुझा देव आहे; तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोल लावत नाही; तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच. तुझ्या घरचा गोर्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घेणार नाही. कारण वनातील सर्व पशू, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरांवरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत, आणि रानांतील प्राणी माझ्या लक्षात आहेत.
स्तोत्रसंहिता 50 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 50
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 50:7-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ