YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 45:10-17

स्तोत्रसंहिता 45:10-17 MARVBSI

अगे कन्ये, ऐक, लक्ष दे, कान लाव; तू आपले लोक व आपल्या बापाचे घर ही विसर, म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल; तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग. सोराची कन्या तुला नजराणा आणील; धनवान लोक तुझे आर्जव करतील. राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे; तिची वस्त्रे भरजरी आहेत. तिला कशिद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील, तिच्यामागून चालणार्‍या कुमारींना तिच्या सख्या तुझ्याकडे आणतील. आनंदाने व उत्साहाने त्यांना मिरवतील, त्या राजमंदिरात प्रवेश करतील. तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील; तू सर्व पृथ्वीवर त्यांना अधिपती करशील. तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन, म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकारस्मरण करतील.