हे परमेश्वरा, मला विरोध करणार्यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्यांशी लढ. ढाल व कवच धारण कर, माझ्या साहाय्यासाठी उभा राहा. भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग. माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो. ते वार्याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो. त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो. कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली. त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो. मग माझा जीव परमेश्वराच्या ठायी उल्लास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील. माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्यापासून सोडवतोस;”
स्तोत्रसंहिता 35 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 35
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 35:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ