YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 32:7-11

स्तोत्रसंहिता 32:7-11 MARVBSI

तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील; मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. (सेला) मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत. दुर्जनाला पुष्कळ दु:खे भोगावी लागतात; परमेश्वरावर भाव ठेवणार्‍यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.