YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 31:1-6

स्तोत्रसंहिता 31:1-6 MARVBSI

हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस; तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर, माझ्याकडे आपला कान लाव; मला सत्वर सोडव; तू माझा प्रबल दुर्ग हो; माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालव. त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो; हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहेस. निरर्थक मूर्तीला भजणार्‍यांचा मी द्वेष करतो; माझा भाव तर परमेश्वरावर आहे.