हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्त्विकपणे वागलो आहे, आणि परमेश्वरावर भरवसा ठेवला आहे; मी घसरणार नाही. हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा. तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे; तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे. अधम लोकांत मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करतो; दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन; म्हणजे मी प्रकटपणे तुझे उपकारस्मरण करीन व तुझी सर्व आश्चर्यकर्मे वर्णन करीन. हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून नेऊ नकोस; त्यांचे हात उपद्रवाने भरलेले आहेत, त्यांचा उजवा हात लाचलुचपतींनी भरलेला आहे. मी तर सात्त्विकपणे वागेन; माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर. माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे; जनसभांत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन.
स्तोत्रसंहिता 26 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 26:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ