माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील. माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो; कारण मी निराश्रित व दीन आहे. माझ्या मनावरचे दडपण काढ; माझ्या संकटातून मला सोडव. माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पाहा; माझ्या सर्व पापांची क्षमा कर. माझे वैरी पाहा, ते फार झाले आहेत; ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करतात. माझ्या जिवाचे रक्षण कर; मला मुक्त कर; मी तुझा आश्रय धरला आहे म्हणून माझी फजिती होऊ देऊ नकोस. सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे.
स्तोत्रसंहिता 25 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 25:15-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ