YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 25:1-7

स्तोत्रसंहिता 25:1-7 MARVBSI

हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे; माझी फजिती होऊ देऊ नकोस; माझ्या वैर्‍यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस; तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात. हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव; तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठव; ती पुरातन काळापासून आहेत. हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.