हे परमेश्वरा तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो; तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्लास होतो! त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहेस, त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाहीस. (सेला) कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस. त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले; तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस. तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो; तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करतोस. त्याने सर्वकाळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस; तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे, परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही.
स्तोत्रसंहिता 21 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 21:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ