YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 19:1-6

स्तोत्रसंहिता 19:1-6 MARVBSI

आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो; तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसर्‍या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो; त्याच्या उष्णतेपासून काहीएक सुटत नाही.