तू माझा दीप उजळतोस; परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो. तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे; परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे; त्यांचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे. परमेश्वरावाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो. तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करतो. तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकवतात. तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस; आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहेस; तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस, माझे पाय घसरले नाहीत.
स्तोत्रसंहिता 18 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 18:28-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ