YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 18:16-24

स्तोत्रसंहिता 18:16-24 MARVBSI

त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले. माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थली बाहेर आणले; तो माझ्याविषयी संतुष्ट होता म्हणून त्याने मला सोडवले. परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे मला फळ दिले; माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. मी त्याच्या दृष्टीने सात्त्विकतेने वागत असे आणि मी अनीतीपासून स्वतःला अलिप्त राखले. म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले.