स्तोत्रसंहिता 17:6-12
स्तोत्रसंहिता 17:6-12 MARVBSI
मी तुझा धावा केला आहे, कारण, हे देवा, तू माझे ऐकतोस; माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. तुझा आश्रय करणार्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव, कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात. त्यांना चरबी चढली आहे; ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करतात. आता ते पावलोपावली आम्हांला घेरत आहेत; ते आम्हांला धुळीस मिळवू पाहत आहेत. भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा, तो आहे.

