YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 148:1-6

स्तोत्रसंहिता 148:1-6 MARVBSI

परमेशाचे स्तवन करा!1 आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा; उर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो, त्याचे स्तवन करा; त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा; अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा; सर्व प्रकाशमय तार्‍यांनो, त्याचे स्तवन करा. आकाशांवरील आकाशांनो, आकाशांवरील जलांनो, त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. त्याने ती सर्वकाळासाठी स्थापली; त्याने नियम लावून दिला त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही.