हे यरुशलेमे, परमेश्वराचा गौरव कर; हे सीयोने, तू आपल्या देवाचे स्तवन कर. कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो; उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो; तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. तो लोकरीसारखे हिम पाडतो; राखेसारखे दवाचे कण पसरतो. तो आपल्या बर्फाचा चुर्याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल? तो आपला हुकूम पाठवून ते वितळवतो; तो आपला वारा वाहवतो तेव्हा पाणी वाहू लागते. तो याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय विदित करतो. कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेशाचे स्तवन करा!1
स्तोत्रसंहिता 147 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 147
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 147:12-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ