हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे; तू आपल्या सत्यतेने व न्याय्यत्वाने माझे ऐक. तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नकोस; कारण तुझ्यापुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही. वैरी माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहे; त्याने माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळी मृत झालेल्यांप्रमाणे मला त्याने अंधकाराच्या स्थळी राहण्यास लावले आहे. माझा आत्मा माझ्या ठायी व्याकूळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे. मी प्राचीन काळचे दिवस मनात आणतो; तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करतो; तुझ्या हातच्या कृतींचे चिंतन करतो. मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. (सेला)
स्तोत्रसंहिता 143 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 143
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 143:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ