YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 130:1-8

स्तोत्रसंहिता 130:1-8 MARVBSI

हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत. हे परमेशा, तू अन्याय लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? तरीपण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे. मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो, आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. हे इस्राएला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे; त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे; तो इस्राएलास त्याच्या सर्व अधर्मांपासून मुक्त करील.