ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्वकाळ टिकणार्या सीयोन डोंगरासारखे आहेत. यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्वकाळ आपल्या लोकांसभोवती आहे. नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत, म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनांवर चालणार नाही. हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत, त्यांचे कल्याण कर. जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो.
स्तोत्रसंहिता 125 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 125
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 125:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ