तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडवले; तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील; कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे. माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन; कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.
स्तोत्रसंहिता 119 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 119
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 119:73-77
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ