YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:137-144

स्तोत्रसंहिता 119:137-144 MARVBSI

हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत. तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे; मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे. संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.