तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्चित केली आहे. मी फार पिडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर; तुझे निर्णय मला शिकव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे. मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो. अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन; माझ्या आशेसंबंधाने मला फजीत होऊ देऊ नकोस. मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन, आणि तुझ्या नियमांकडे निरंतर लक्ष ठेवीन. तुझ्या नियमांपासून बहकणार्या सर्वांचा तू धिक्कार करतोस; त्यांचे कपट निरर्थक आहे. पृथ्वीवरील सर्व दुर्जनांस तू गाळासारखे दूर करतोस; म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत. तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो. मी न्याय व नीती आचरली आहे; माझा छळ करणार्यांच्या हाती मला सोडून देऊ नकोस. तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस. तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे, आणि तू आपले नियम मला शिकव. मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे. परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.
स्तोत्रसंहिता 119 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 119
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 119:105-128
5 दिवस
आशीर्वादित आणि मुबलक परतफेड मिळविण्याची सुरुवात योग्य गुंतवणूक करण्यापासून होते. जर तुम्ही नवीन ख्रिस्ती असाल तर देवाच्या वचनाचा नियमितपणे अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विश्वासात मोठी गुंतवणूक करू शकत नाही. ते दररोज वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि प्रभावीपणे लागू करण्यात मदत करण्यासाठी येथे प्रारंभ करा. "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ