“मी फार पीडित आहे,” असे मी म्हणतो; तरी देवावर माझी श्रद्धा आहे. मी अधीरपणे म्हणालो की, “सर्व माणसे लबाड आहेत.” परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ? मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे; मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे; तू माझी बंधने सोडली आहेत. मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. परमेश्वराच्या घराच्या अंगणात, हे यरुशलेमा, तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेशाचे स्तवन करा!1
स्तोत्रसंहिता 116 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 116
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 116:10-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ