YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 106:40-47

स्तोत्रसंहिता 106:40-47 MARVBSI

त्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला; त्याला आपल्या वतनाचा वीट आला. त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले; त्यांच्या द्वेष्ट्यांनी त्यांच्यावर राज्य केले. त्यांच्या शत्रूंनी त्यांना छळले; ते त्यांच्या हाताखाली दडपून गेले. अनेक वेळा त्याने त्यांना मुक्त केले तरी ते आपला हेका न सोडता बंडखोरच राहिले, व आपल्या अनीतीने अधोगतीस पोहचले. तथापि त्यांची आरोळी ऐकून परमेश्वराने त्यांच्या संकटाकडे दृष्टी लावली; त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली. त्यांचा पाडाव करणार्‍या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी त्याने दया उत्पन्न केली. हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हांला तार, आम्हांला राष्ट्रांतून काढून एकवट कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे स्तवन करू, तुझ्या स्तवनात आम्हांला उल्लास वाटेल.