YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 105:12-25

स्तोत्रसंहिता 105:12-25 MARVBSI

त्या वेळी ते मोजके, फार थोडके होते, व तेही त्या देशात उपरे असे होते. ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्‍या लोकांत हिंडले. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही, त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की, “माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.” त्याने देशावर दुष्काळ आणला; त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला. त्यांच्यापुढे त्याने एक मनुष्य पाठवला; योसेफ दास म्हणून विकला गेला; त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली; त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकवले. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले. राजाने माणसे पाठवून त्याला सोडवले; राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमले, अशासाठी की, त्याने आपल्या मनाप्रमाणे त्याच्या सरदारांना शिकवावे आणि त्याच्या मंत्र्यांना शहाणपण सांगावे. नंतर इस्राएल मिसर देशात आला; याकोब हामाच्या देशात उपरा म्हणून राहिला. परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढवले, त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना बलिष्ठ केले. आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा आणि आपल्या सेवकांशी कपटाने वागावे म्हणून त्याने त्यांच्या शत्रूंचे मन फिरवले.