दया व न्याय ह्यांविषयी मी गाईन; हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन, मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करतो; तो मला बिलगणार नाही. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल; मी वाइटाशी परिचय ठेवणार नाही. आपल्या शेजार्याची गुप्तपणे चहाडी करणार्याचा मी विध्वंस करीन; जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्त्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. कपट करणार्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही; असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन, म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणार्या सर्वांचा उच्छेद होईल.
स्तोत्रसंहिता 101 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 101
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 101:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ