YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 6:12-19

नीतिसूत्रे 6:12-19 MARVBSI

अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो; डोळे मिचकावतो, पायांनी इशारा करतो, बोटांनी खुणावतो; त्याच्या मनात उद्दामपणा असतो; तो दुष्कर्माची योजना करीत असतो; तो वैमनस्य पसरवतो. ह्यामुळे त्याच्यावर विपत्ती अकस्मात येईल त्याचा एकाएकी चुराडा होईल, त्याचा निभाव लागणार नाही. परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे : उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंत:करण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी, व भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत.