YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 27:9-17

नीतिसूत्रे 27:9-17 MARVBSI

तेल व सुगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणार्‍या मित्राचे माधुर्य होय. स्वत:च्या व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नकोस; आपल्या संकटसमयी भावाच्या दारी जाऊ नकोस; दूर असलेल्या आपल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा. माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणार्‍यास मी प्रत्युत्तर देईन. चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. अनोळख्याला जो जामीन होतो त्याचे वस्त्र ठेवून घे; जो परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणादाखल ठेव. कोणी मोठ्या पहाटेस उठून उंच स्वराने आपल्या मित्रास आशीर्वाद दिला, तर तो त्याला शाप होय असे मानतील. पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळणारे ठिपके, व कटकटी बायको ही सारखीच आहेत; तिला आवरणारा म्हणजे वार्‍याला आवरणारा होय; त्याच्या उजव्या हाताला तेल लागल्यासारखे होते. तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो.