YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 4:1-3

फिलिप्पैकरांस पत्र 4:1-3 MARVBSI

म्हणून प्रियजनहो, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे, व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा. आणि तसेच हे माझ्या खर्‍या सोबत्या, मी तुलाही विनवतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर, आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.