YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 3:1-4

फिलिप्पैकरांस पत्र 3:1-4 MARVBSI

शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हांला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. त्या कुत्र्यांविषयी सावध असा; त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा. कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत. तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसर्‍या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार.