ओबद्याला झालेला दृष्टान्त : अदोमाविषयी प्रभू परमेश्वराने हे म्हटले : परमेश्वरापासून आम्ही हे वर्तमान ऐकले आहे; एक जासूद राष्ट्रांमध्ये पाठवला आहे; तो म्हणतो, “उठा, आपण त्यांच्याबरोबर लढायला जाऊ.” पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र केले आहे; तुला फार तुच्छ मानतात. खडकाच्या कपारींत उच्च स्थानी वसणार्या, तू आपल्या मनात समजतोस की, “मला खाली जमिनीवर कोण पाडणार?” ह्या तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिला आहे. तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे तार्यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडीन, असे परमेश्वर म्हणतो.
ओबद्या 1 वाचा
ऐका ओबद्या 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ओबद्या 1:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ