दहाव्या दिवशी दानाच्या वंशजांचा सरदार अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र; होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू; पापार्पणासाठी एक बकरा; शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते. अकराव्या दिवशी आशेराच्या वंशजांचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र; होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू; पापार्पणासाठी एक बकरा; शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याचे अर्पण होते. बाराव्या दिवशी नफतालीच्या वंशजांचा सरदार एनानाचा मुलगा अहीरा ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र; होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू; पापार्पणासाठी एक बकरा; शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे एनानाचा मुलगा अहीरा ह्याचे अर्पण होते. वेदीला तैलाभ्यंग झाला त्या दिवशी इस्राएल लोकांच्या सरदारांकडून तिच्या समर्पणाचे अर्पण झाले ते हे : चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे व सोन्याची बारा धूपपात्रे; प्रत्येक चांदीचे ताट एकशे तीस शेकेलांचे व प्रत्येक चांदीचा कटोरा सत्तर शेकेलांचा अशी एकंदर सर्व चांदीची पात्रे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती; धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती; सर्व धूपपात्रांचे सोने एकशे वीस शेकेल होते; होमार्पणासाठी एकंदर बारा गोर्हे, बारा मेंढे, वर्षावर्षाची नरजातीची बारा कोकरे, ही त्यांच्या बरोबरच्या अन्नार्पणासह होती; तसेच पापार्पणासाठी बारा बकरे होते; शांत्यर्पणासाठी एकंदर चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे आणि वर्षावर्षाची नरजातीची साठ कोकरे होती. वेदीला तैलाभ्यंग झाल्यावर तिच्या समर्पणाचे हे अर्पण होते. मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शनमंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करूबांमधून झालेली वाणी त्याने ऐकली; ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला.
गणना 7 वाचा
ऐका गणना 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 7:66-89
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ