YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 7:36-47

गणना 7:36-47 MARVBSI

पाचव्या दिवशी शिमोनाच्या वंशजांचा सरदार सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीएल ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र; होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू; पापार्पणासाठी एक बकरा; शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याचे अर्पण होते. सहाव्या दिवशी गादाच्या वंशजांचा सरदार दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती; धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र; होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू; पापार्पणासाठी एक बकरा; शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते.