YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 5:5-8

गणना 5:5-8 MARVBSI

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना असे सांग की, परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून जी पापे मानवप्राणी करतात, त्यांपैकी एखादे पाप कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने केले आणि ती व्यक्ती दोषी ठरली, तर त्या व्यक्‍तीने स्वतःचे पाप कबूल करावे आणि ज्याचा अपराध केला असेल त्याला आपल्या अपराधाबद्दलची पूर्ण भरपाई करून देऊन त्यात आणखी तिच्या एक पंचमांशाची भर घालावी; पण अपराधाबद्दलची भरपाई स्वीकारण्यास त्या मनुष्याचा कोणी वारस नसला तर त्या अपराधाबद्दल परमेश्वराजवळ केलेली भरपाई याजकाची व्हावी; जो प्रायश्‍चित्ताचा मेंढा त्याच्या प्रायश्‍चित्तासाठी अर्पण करण्यात येईल त्याशिवाय हीही त्याची व्हावी.