YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 33:37-42

गणना 33:37-42 MARVBSI

कादेशाहून कूच करून त्यांनी अदोम देशाच्या सीमेवरील होर पर्वताजवळ तळ दिला. इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस अहरोन याजक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे होर पर्वतावर गेला आणि तेथे मृत्यू पावला. अहरोन होर पर्वतावर मृत्यू पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता. कनानातील नेगेबात राहणार्‍या अरादाच्या कनानी राजाने तेव्हा इस्राएल लोक आल्याची बातमी ऐकली. मग होर पर्वतापासून कूच करून त्यांनी सलमोना येथे तळ दिला. सलमोना येथून कूच करून त्यांनी पूनोन येथे तळ दिला.