हसेरोथ येथून कूच करून रिथमा येथे त्यांनी तळ दिला. रिथमा येथून कूच करून त्यांनी रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला. रिम्मोन-पेरेस येथून कूच करून त्यांनी लिब्ना येथे तळ दिला. लिब्ना येथून कूच करून त्यांनी रिस्सा येथे तळ दिला. रिस्सा येथून कूच करून त्यांनी कहेलाथा येथे तळ दिला. कहेलाथा येथून कूच करून त्यांनी शेफेर डोंगराजवळ तळ दिला. शेफेर डोंगराजवळून कूच करून त्यांनी हरादा येथे तळ दिला. हरादा येथून कूच करून त्यांनी मकहेलोथ येथे तळ दिला. मकहेलोथ येथून कूच करून त्यांनी तहथ येथे तळ दिला. तहथाहून कूच करून त्यांनी तारह येथे तळ दिला. तारहाहून कूच करून त्यांनी मिथका येथे तळ दिला. मिथका येथून कूच करून त्यांनी हशमोना येथे तळ दिला. हशमोना येथून कूच करून त्यांनी मोसेरोथ येथे तळ दिला. मोसेरोथाहून कूच करून त्यांनी बनेयाकान येथे तळ दिला. बनेयाकानाहून कूच करून त्यांनी होर-हागिदगाद येथे तळ दिला. होर-हागिदगादाहून कूच करून त्यांनी याटबाथा येथे तळ दिला. याटबाथा येथून कूच करून त्यांनी अब्रोना येथे तळ दिला. अब्रोना येथून कूच करून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला. एसयोन-गेबेराहून कूच करून त्यांनी त्सीन रान म्हणजे कादेश येथे तळ दिला.
गणना 33 वाचा
ऐका गणना 33
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 33:18-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ