परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या अबारीम पर्वतावर तू चढून जा व जो देश मी इस्राएल लोकांना देऊ केलेला आहे तो तेथून पाहा. तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील. कारण त्सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्या वेळी त्या झर्याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रकट करावे म्हणून जी माझी आज्ञा होती तिच्याविरुद्ध तुम्ही बंड केले.” (त्सीन रानातील कादेश येथील मरीबा नावाचा हा झरा.) मोशे परमेश्वराला म्हणाला, “सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी; तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.” तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे. एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्यादेखत त्याला अधिकारारूढ कर. आपला काही अधिकार त्याला दे; म्हणजे इस्राएल लोकांची सारी मंडळी त्याचे मानील. तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील; यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्यासहित सर्व इस्राएल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील.” परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले; त्याने यहोशवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर उभे केले; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकारारूढ केले.
गणना 27 वाचा
ऐका गणना 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 27:12-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ