मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे; जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालतो व ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे : मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील. त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील तोवर इस्राएल आपला प्रभाव दाखवील. याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करील.”
गणना 24 वाचा
ऐका गणना 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 24:15-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ