“मंडळीला सांग की, तुम्ही कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या निवासस्थानापासून निघून जा.” तेव्हा मोशे उठून दाथान व अबीराम ह्यांच्याकडे गेला आणि इस्राएल लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ गेले. तो मंडळीला म्हणाला, “तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका; नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल.” मग ते कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या डेर्याजवळून निघून गेले; आणि दाथान व अबीराम बाहेर निघाले व आपली बायकामुले व तान्ही बाळे ह्यांच्यासह आपल्या तंबूंच्या दाराजवळ उभे राहिले. तेव्हा मोशे म्हणाला, “मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केलेली नाहीत, तर ती करायला परमेश्वराने मला पाठवले आहे हे तुम्हांला दिसून येईल. इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे ह्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे ह्यांचे पारिपत्य झाले तर परमेश्वराने मला पाठवले नाही असे समजा. पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडवली म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले, तर असे समजा की, ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे.” हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली. आणि पृथ्वीने आपले तोड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली. ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले.
गणना 16 वाचा
ऐका गणना 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 16:24-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ