मग मोशे कोरहाला म्हणाला, “उद्या तू आपल्या सार्या साथीदारांबरोबर परमेश्वरासमोर हजर हो; तू, ते व अहरोन तुम्ही सर्व आपली धुपाटणी घेऊन त्यात धूप घाला; प्रत्येकी एक धुपाटणे ह्याप्रमाणे दोनशे पन्नास धुपाटणी परमेश्वरासमोर आणावीत; तू व अहरोन ह्यांनीही आपापले धुपाटणे आणावे.” तेव्हा त्यांनी आपापले धुपाटणे आणून त्यात विस्तव ठेवला व त्यावर धूप घातला, आणि मोशे व अहरोन ह्यांच्याबरोबर ते दर्शनमंडपाच्या दाराजवळ उभे राहिले. कोरहाने त्यांच्याविरुद्ध सगळी मंडळी दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमवली, तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले. परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या मंडळीतून वेगळे व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करतो.”
गणना 16 वाचा
ऐका गणना 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 16:16-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ