परंतु धिटाईने काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशीय असो किंवा परदेशीय असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा; त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. त्याने परमेश्वराचे वचन तुच्छ मानले व त्याची आज्ञा मोडली, म्हणून त्याचा सर्वस्वी उच्छेद व्हावा; त्याच्या दुष्कर्माची शिक्षा त्यानेच भोगावी.” इस्राएल लोक रानात राहत होते तेव्हा त्यांना एक मनुष्य शब्बाथवारी लाकडे गोळा करीत असताना आढळला. ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला ते त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळी ह्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी त्याला अटकेत ठेवले, कारण त्याचे काय करावे ह्याविषयी काही स्पष्ट केलेले नव्हते. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या मनुष्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार करावा.” परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला व तो मेला.
गणना 15 वाचा
ऐका गणना 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 15:30-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ