YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 14:1-5

गणना 14:1-5 MARVBSI

तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. सर्व इस्राएल लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले; सर्व मंडळी त्यांना म्हणाली, “आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. तलवारीने आमचा निःपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हांला ह्या देशात का नेत आहे? आमच्या बायकामुलांची लूट होईल! आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय?” ते आपसात म्हणाले, “आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशाला परत जाऊ या.” तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले