YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 8:5-8

नहेम्या 8:5-8 MARVBSI

एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडला तेव्हा एज्रा सर्वांना दिसला, कारण तो सर्वांहून उंच ठिकाणी उभा होता; त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला; व सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” असे म्हटले आणि आपली डोकी लववून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला. येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला; वाचले तेवढे लोकांना चांगले समजले.