YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 5:1-7

नहेम्या 5:1-7 MARVBSI

तेव्हा लोकांनी व त्यांच्या स्त्रियांनी आपल्या यहूदी भाऊबंदांविरुद्ध मोठी ओरड केली. कित्येक म्हणू लागले की, “आम्ही आमचे पुत्र व कन्या मिळून बहुत जण आहोत, म्हणून आम्हांला जगण्यासाठी धान्य मिळाले पाहिजे.” कित्येक म्हणू लागले की, “धान्य मिळावे म्हणून महागाईमुळे आम्ही आमची शेते, द्राक्षांचे मळे व घरे गहाण ठेवली आहेत.” दुसरे कित्येक म्हणू लागले की, “राजाचा कर भरण्यासाठी आमच्या शेतांवर व द्राक्षांच्या मळ्यांवर आम्ही पैसा काढला आहे. वस्तुतः आमची शरीरे आमच्या भाऊबंदांच्या शरीरां-सारखीच आहेत व आमची मुलेबाळे त्यांच्या मुलाबाळांसारखीच आहेत. पाहा, आम्ही आपले पुत्र व कन्या ह्यांना दास्य करण्यासाठी गुलामगिरीत ठेवले आहे; आमच्या काही कन्या दासी होऊन राहिल्या आहेत; त्यांना सोडवण्याची आमच्यात काही ताकद राहिली नाही, कारण आमची शेते व द्राक्षांचे मळे दुसर्‍यांच्या हाती गेले आहेत.” हे त्यांचे शब्द व ओरड ऐकून मला क्रोध आला. मग मी आपल्या मनात विचार करून सरदार व शास्ते ह्यांच्याशी वाद करून म्हणालो की, “तुम्ही आपल्या बांधवांकडून वाढीदिढी घेता.” मग मी त्यांच्याविरुद्ध एक मोठी सभा भरवली.