ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालवले; तो कोट निम्मा तयार झाला; कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते. यरुशलेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत असे सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी व अश्दोदी ह्यांनी ऐकले तेव्हा त्यांना फार राग आला; त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुशलेमेबरोबर लढू व तेथे गोंधळ उडवून देऊ. पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली.
नहेम्या 4 वाचा
ऐका नहेम्या 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नहेम्या 4:6-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ