ह्या कारणास्तव लोकांच्या हाती तलवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यांना ठेवले. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.” देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली हे आमच्या शत्रूंनी ऐकले तेव्हा आम्ही सगळे कोटाकडे परत जाऊन आपापल्या कामावर रुजू झालो. त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करत आणि यहूदाच्या सर्व घराण्यांमागे त्यांचे सरदार उभे असत. कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करत व दुसर्या हातात शस्त्रे धारण करत. बांधकाम करणारे आपल्या कंबरेस तलवार लावून काम करत. रणशिंग वाजवणारा माझ्याजवळ असे. मी सरदारांना, शास्त्यांना व वरकड लोकांना सांगून ठेवले होते की, “हे काम मोठे व विस्तृत असून कोटावर काम करत असता आपण एकमेकांपासून दूर असतो. तर रणशिंगाचा शब्द जेथे ऐकू येईल तेथे तुम्ही आमच्याकडे एकत्र व्हा; आपला देव आपल्यातर्फे लढेल.” ह्या प्रकारे आम्ही काम करू लागलो; त्यांच्यातले अर्धे लोक पहाटेपासून तारे दिसू लागत तोपर्यंत भाले घेऊन उभे असत. त्या वेळी लोकांना मी हेही सांगितले होते की प्रत्येक मनुष्याने आपल्या दासासह यरुशलेमेच्या आतच रात्रीचे बिर्हाडास राहावे म्हणजे ते रात्री आमची रखवाली करतील आणि ते दिवसा काम करतील.” मी आपले कपडे उतरवीत नसे; तसेच माझे भाऊबंद, माझे चाकर आणि माझ्यामागून चालणारे गारदी कोणीही आपले कपडे उतरवीत नसत; ते सर्व आपापली शस्त्रे हाती घेऊन पाण्याला जात.
नहेम्या 4 वाचा
ऐका नहेम्या 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नहेम्या 4:13-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ