YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 4:10-14

नहेम्या 4:10-14 MARVBSI

यहूदी लोक म्हणू लागले की, “भारवाहकांची शक्ती क्षीण झाली आहे, व अजून खच फार पडला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही.” आमचे शत्रू म्हणाले, “आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यांना मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडीपर्यंत त्यांना काही कळायचे नाही की दिसायचे नाही.” मग जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे दहादा येऊन म्हणाले की, “तुम्ही आमच्याकडे परत या.” ह्या कारणास्तव लोकांच्या हाती तलवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यांना ठेवले. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”