आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहूदी लोकांचा उपहास करू लागला. तो आपले बांधव व शोमरोनचे सैन्य ह्यांच्यासमोर म्हणाला, “हे दुर्बळ यहूदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आच खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगार्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय?” त्याच्याजवळ अम्मोनी तोबीया होता तो म्हणाला, “ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील.” हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे; ते निर्भर्त्सना करीत आहेत ती त्यांच्या शिरी उलट आण; बंदिवासाच्या देशात त्यांची लूट होऊ दे. त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको, त्यांची पातके तुझ्यापुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणार्यांसमोर तुला संताप आणला आहे.
नहेम्या 4 वाचा
ऐका नहेम्या 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नहेम्या 4:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ